ग्रामपंचायत ढोके दापिवली बद्दल

ढोके व दापिवली ही गावे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात स्थित असून ग्रामीण आणि नैसर्गिक वातावरणाने नटलेली आहेत. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असून गावातील नागरिक पारंपरिक पद्धतीने शेती व पूरक व्यवसाय करतात. ग्रामपंचायत मार्फत गावातील पायाभूत सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सामाजिक विकास यांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात.

गावात प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा आणि बालकांच्या संगोपनासाठी अंगणवाडी सुविधा उपलब्ध आहेत. डिजिटल युगाशी सुसंगत राहण्यासाठी ग्रामपंचायत नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देते.

सन २०११ च्या जनगणनेनुसार ढोके गावाची लोकसंख्या सुमारे ७९३ असून गावाचे क्षेत्रफळ सुमारे ५३.०४ हेक्टर आहे. हे गाव अंबरनाथ शहरापासून सुमारे १९ कि.मी. अंतरावर स्थित आहे.

🏛️ प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत ढोके दापिवली ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. ग्रामपंचायत गावातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, सामाजिक व आर्थिक विकास यांसाठी विविध योजना राबविते.

ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती

ग्रामपंचायत ढोके दापिवली
पोस्ट – एरंजाड,
तालुका – अंबरनाथ,
जिल्हा – ठाणे, महाराष्ट्र – 421301

📧 ई-मेल: gpdhokedapivali2@gmail.com 

सरपंच:
सौ. पूजा सचिन गायकवार

उपसरपंच:
सौ. सरिता गणेश सावर

ग्रामपंचायत अधिकारी:
श्री. दत्ता प्रभाकर साबळे
📞 मोबाईल: 9881043311

 

ग्रामपंचायत सदस्यांची माहिती

ग्रामपंचायत ढोके दापिवलीमध्ये एकूण ९ सदस्य कार्यरत आहेत. सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे —

१. श्री. योगेश भालचंद्र भोईर
२. श्री. नितीन बाळकृष्ण गायकवार
३. श्री. श्रीधर बलराम भोपी
४. सौ. माधुरी रामदास भोईर
५. सौ. जागृती अमोल भोईर

ग्रामपंचायत आढावा व सुविधा

ग्रामपंचायत ढोके दापिवली हद्दीत खालील शैक्षणिक व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत —

• अंगणवाडी केंद्र:
– ढोके
– दापिवली
– आंबेशिव

• जिल्हा परिषद शाळा:
– ढोके दापिवली
– आंबेशिव खुर्द

• ग्रामपंचायत मार्फत विविध मूलभूत सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

योजना व विकास उपक्रम

ग्रामपंचायत ढोके दापिवलीमध्ये विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात, त्यामध्ये पुढील योजनांचा समावेश आहे —

• जलजीवन मिशन
• प्रधानमंत्री आवास योजना
• स्वच्छ भारत अभियान
• महिला बचतगट / उद्योजकता योजना
• आदिवासी व ग्रामीण विकास योजना
• डिजिटल सेवा सुविधा

ग्रामपंचायतीचा उपलब्ध निधी सुमारे ₹ 5,50,000 असून त्याचा उपयोग गावातील विविध विकासकामे व नागरिक सुविधा पुरविण्यासाठी केला जातो.

महिला सक्षमीकरण व सामाजिक संघटना

ग्रामपंचायत ढोके दापिवली अंतर्गत एकूण २४ महिला बचत गट कार्यरत असून महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे कार्य करतात. प्रमुख बचत गट पुढीलप्रमाणे —

• यशोदीप स्वयं सहाय्यता समूह
• साई नमन गट
• श्री रामसमर्थ गट
• साई श्रद्धा गट
• श्री गणेश गट
• ओम साई गट
• जय सदगुरु गट
• आई एकवीरा गट
• निलिमा गट
• गावदेवी गट
• सानिया गट
• समृद्धी गट
• पूनम गट
• आर्या गट
• समीक्षा गट
• मानसी गट
• विघ्नहर्ता गट
• संस्कृती गट
• जय मल्हार गट
• शिव मल्हार गट
• महालक्ष्मी गट
• दत्ता कृपा गट
• श्री राम गट
इत्यादी बचत गट कार्यरत आहेत.

हे बचत गट महिलांना आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता विकास आणि सामाजिक प्रगतीसाठी मदत करतात.

नागरिक सेवा

ग्रामपंचायत ढोके दापिवलीमार्फत नागरिकांना पुढील सेवा उपलब्ध करून दिल्या जातात —

• जन्म प्रमाणपत्र
• मृत्यू प्रमाणपत्र
• विवाह प्रमाणपत्र दाखला
• दारिद्र्य रेषेचा दाखला
• रहिवासी दाखला
• ग्रामपंचायत येणे नसल्याचा दाखला
• नमुना नं. ८ उतारा (मालमत्ता कर नोंद)
• जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र
• विविध शासकीय योजनांचे अर्ज
• घरकुल योजना अर्ज
• नळजोडणी अर्ज
• ऑनलाइन सेवा सुविधा

पुरस्कार व सन्मान

ग्रामपंचायत ढोके दापिवलीला ग्रामीण विकास आणि स्वच्छतेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पुढील पुरस्कार प्राप्त झाले आहेत —

• आर. आर. आबा स्मार्ट ग्राम पुरस्कार
• संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार

योजना व प्रमुख कार्ये

कामगिरी व विकास उपक्रम

अंबरनाथ पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

ग्राग्रामपंचायत ढोके दापिवलीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.

03

Super power Administration

Digitalization of all Gram Panchayat services

Health & Education

Improved education and healthcare access in rural areas

Entrepreneurship

Women entrepreneurship and youth skill development

Together, we aim to make every village model of cleanliness, digital governance, and sustainable development

Ambernath Panchayat Samiti